रिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये

मुंबई :

रिटायरमेंट नंतर सर्वसाधारणपणे सर्वच खेळाडू हे प्रसिद्धीच्या झोताबाहेर जातात. काही जण या ना त्या माध्यमातून चर्चेत असतात परंतु क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर मात्र रिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही आधीइतकाच प्रसिद्ध आहे. एवढेच नव्हते तर तो वेगवेगळ्या 18 ब्रँडसच्या माध्यामतून मोठी कमाई करत आहे. रिटायर झाल्यावर इतर खेळाडू निवांत असतात परंतु सचिन मात्र वेगवेगळ्या जाहिराती आणि कामांमध्ये आधीपेक्षा जास्त व्यस्त आहे.

सचिन तेंडुलकर आपल्या कारकीर्दीच्या उंचीवर असतानादेखील त्याच्याकडे इतक्याच ब्रँड्सचे अ‍ॅन्डोर्समेंट होते, अशी माहिती एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेन्ट कंपनीचे संचालक मृत्मोय मुखर्जी यांनी दिली. 2019 मध्ये तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू 15.8 टक्क्यांनी वाढून 25.1 मिलियन डॉलर (185 कोटी रुपये) पर्यंत वाढली आहे. Duff & Phelps च्या 2019 च्या लिस्ट मध्ये सचिन हा एकमेव रिटायर्ड सेलिब्रिटी होता. 

Livpure आणि Luminous, डीबीएस बँक, जिलेट, BMW आणि UNICEF अशा एकूण 18 ब्रँडससह सचिन काम करत आहे. तसेच सचिनने 2016 मध्ये आपली पत्नी अंजली तेंडुलकर हिच्यासमवेत स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी SRTSM सुरु केली. क्रिकेट कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला 6-7 कोटी रुपये ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंटमधून मिळत असे. सध्या ते 4 ते 5 कोटींवर आलेले आहे. 

बिझनेसमॅन म्हणून त्यांनी ‘Sachin Saga’ नावाचा एक ऑनलाइन गेम तयार केला आहे. आतापर्यंत सुमारे 1.5 मिलियन गेमर्स त्यावर खेळतात. मुंबई टी -20 लीगशी त्याची दीर्घकाळ भागीदारी आहे. याशिवाय त्याने Middlesex Cricket आणि County Club बरोबर देखील भागीदारी करून Tendulkar Middlesex Global Academy स्थापन केली आहे. त्यांनी 100MB नावाचे एक प्लॅटफॉर्म देखील डिझाइन केले आहे, जिथे अनेक स्वरूपात सामग्री उपलब्ध आहे, अशीही माहिती पुढे बोलताना मुखर्जी यांनी दिली.

एवढे आहेत सोहल मिडीयावर सचिनचे फॉलोअर्स :-

फेसबुक – 2.8 कोटी

ट्विटरवर – 3.43 कोटी

इंस्टाग्राम – 2.71 कोटी

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here