रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे हे आहेत ‘5’ उपाय; नक्कीच वाचा

बदलती जीवनशैली, बैठे काम करण्याची पद्धत, पौष्टिक नसणारा आहार, आणि व्यायामाचा अभाव यामुळे सध्या तरुणाई विविध आजारांनी ग्रासलेली आहे. लठ्ठपणा तर भारतीय तरूण सर्वात पुढे आहेत. बहुतांश तरुणांना मधुमेह आणि रक्तदाबाचा अगदी कमी वयात त्रास आहे. परिणामी अनेक व्यक्तींना हृदयरोगाचाही त्रास होतो. सध्या मार्केटमध्ये रक्तदाबावर अनेक औषधे/गोळ्या आहेत. मात्र सतत गोळ्या खाण्याचेही अनेक तोटे आहेत म्हणूनच आज आम्ही आपल्याला औषधाच्या मार्‍यामुळे आरोग्यावर परिणाम होतात. मग ही औषध कमी करायची असतील तर त्यासोबत आहारात काही पदार्थांचा समावेश करणं तसेच आहाराचं पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे.

  • आहारामध्ये लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स, मीठाचा समावेश कमी करा.
  • बोनलेस चिकन, मासे, रेड मीट, समुद्रातील मासे टाळा.
  • नियमित चालणं किमान इतका व्यायाम केलात तरीही तुम्हांला अनेक आजारांचा धोक दूर ठेवायला मदत होईल. 
  • आठवड्यातून किमान 5 दिवस अर्धा तास चालणं हा रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फार महत्त्वाचा व्यायाम आहे.
  • खारावलेले पदार्थ, अळणी पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणं टाळा. 
  • मद्यपान हे आरोग्याला अत्यंत धोकादायक आहे. 
  •  मानसिक धक्का बसेल किंवा तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा.
  • तुमच्या आवडत्या छंदामध्ये, योगाभ्यासामध्ये मन रमवा. यामुळे हळूहळू ताण हलका होण्यास मदत होते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here