अशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

प्रत्येक बिर्याणीची एक वेगळी टेस्ट असते. बिर्याणी ही शाही रुबाब असलेली रेसिपी आहे. जेवढी शाही तेवढीच किचकट आणि तेवढीच लज्जतदार अशी ही रेसिपी… आज आम्ही तुम्हाला गावठी तडका देत ‘गावरान चिकन दम बिर्याणी’ कशी बनवायची हे सांगणार आहोत.

‘गावरान चिकन दम बिर्याणी’ बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळी हो…

 1. 1 किलो गावरान चिकन
 • 1 किलो तांदूळ(चिनौर)
 • 6-7 कांदे छान लांब बारीक बारीक काप
 • 1 मोठी वाटी बारीक चिरलेला कोशिंबीर
 • 1 वाटी पुदिन्याचे पान
 • 8 हिरव्या मिरच्या कट केलेल्या
 • 1/2 लिंबाचा रस
 • 4 ड्रॉप केवडा
 • 100 ग्राम तुप
 • 200 ग्राम दही
 • 6 मोठ्या इलायची
 • 6 कलमी(१ इंच)
 • 1 टेबल स्पून मिरे
 • 1 टेबल स्पून जिरे, सहजिर
 • 4 तेजपान
 • 1 टेबल स्पून जाविञि फुले
 • १०, १२ लवंग
 • ६, ७ इलायची
 • चवीनुसार मिठ
 • 2 टेबल स्पून लाल तिखट
 • 1 टीस्पून हळद
 • 2 टेबल स्पून बिर्याणी मसाला पावडर
 • 1 टेबल स्पून गरम मसाला पावडर
 • फोडणी करीता तेल
 • 1/2 टीस्पून रंग (केसर धागे) दुधात भिजवून,

साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला

 1. सर्वप्रथम आपण चिकन मॅरीनेट करून घेऊ. मँरीनेट करण्यासाठी एका वाटेमध्ये चिकन घ्यावं नंतर त्यात दही, कट केलेल्या मिरच्या, रस, १ टेबलस्पून तिखट, १ टीस्पून हळद, १ टेबल बिर्याणी मसाला, १ टेबलस्पून गरम मसाला, थोडी कोशिंबीर, पुदिन्याचे पान, चवीनुसार मीठ,३ मोटी इलायची,४ इलायची, ४ लवंग,३ कलमी, जाविञी फुले, तेजपान एकञ करून चार तास मँरीनेट करून घ्या. फ्रिजमध्ये किंवा बाहेरही ठेवू शकता.
 2.  नंतर बारीक चिरलेला लांब कांदा छान तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावा,मोकळं करून छान खुसखुशीत होईपर्यंत थंड होऊ,तांदुळ धुवून बाजूला ठेवा.
 3. नंतर बिर्याणीचा भात शिजवण्यासाठी सर्व प्रथम एका पातेल्यात पाणी ठेवून त्याला उकळी येऊ द्या. नंतर त्यात वाचलेले खडेमसाले तेजपान, छोटी इलायची, मोठी इलायची, लवंग, जिरे, मीरे, कलमी आणि जावीञी फुल, कोशिंबीर ,तांदूळ टाकावे आणि 70टक्के शिजवून घ्यावे.
 4. मग कुकर मध्ये थोडं तेल टाकून त्यात खडा मसाला टाकून मॅरीनेट केलेले चिकन ५०% शिजवून घ्या. नंतर तांदूळ शिजले की एका चाळणीमध्ये तादळातले पूर्ण पाणी निथळन्यासाठी ठेवून द्या
 5. चिकन 50% शिजलं की गॅस बंद करून खाली उतरून घ्यावे. नंतर चिकनवर आधी तळलेले कांदे, पुदिन्याचे पान, कोशिंबीर टाकून त्यावर भाताची लेअर टाकून घ्यावी. नंतर त्यावर एक चमचा तूप टाका.
 6. तूप टाकलं की नंतर रंग किंवा केशर दूध मध्ये भिजलेले टाका. तळलेले कांदे, बारीक कोशिंबीर, पुदीण्याचे पान टाकून भाताचा लेअर टाकून स्टेप्स बाय स्टेप्स करून घ्या.
 7. सर्व लेयर्स पूर्ण झाल्या की बिर्याणीच्या वरती केवड्याचे चार ड्रॉप टाकावे म्हणजे बिर्याणीला छान स्वाद येतो. नंतर कुकरचे झाकण लावून 20 मिनिटं मध्यम आचेवर एक शिट्टी होईपर्यंत शिजवुन घ्या. नंतर गँस बंद करून तवा गरम करून तव्यावर पंधरा मिनिट मंद आचेवर ठेवा. यावरून काढलं की शिट्टी वरती करून पूर्ण वाफ काढून घ्या.

आपली गावरान चिकन दम बिर्याणी तयार

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here