ज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार

दिल्ली :

मध्यप्रदेशमध्येही पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर तिथेही भाजप आणि कॉंग्रेसमधील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच एका स्री उमेदवाराला आयटम संबोधल्याने निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांना झटका देत त्यांचे स्टार प्रचारक पद काढले. दरम्यान कमलनाथ यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यावर जहरी टीका करत त्यांनाही कुत्रे संबोधले होते. यावरून संतप्त झालेले सिंदिया म्हणाले की होय मी कुत्रा आहे आणि मी माझ्या मालकाचा प्रामाणिक कुत्रा आहे.

नेमकं काय म्हणाले ज्योतिरादित्य सिंदिया :-

कमलनाथजी इथे आले. आणि म्हणाले की मी कुत्रा आहे. हो कमलनाथजी ऐका… मी कुत्रा आहे कारण माझी मालक माझी जनता आहे. मी कुत्रा आहे कारण कुत्रा आपल्या मालकाची आणि दात्याची रक्षण करतो. मी कुत्रा आहे कारण जर कुणी माझ्या मालकाकडे बोट केले, माझ्या मालकासोबत गैरव्यवहार केला तर हा कुत्रा चावल्याशिवाय राहणार नाही.

सध्या देशाच्या राजकीय पटलावर मध्यप्रदेश पोटनिवडणुकीमुळे, बिहार विधानसभा निवडणुकीमुळे आणि महाराष्ट्र राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य निवडीमुळे चर्चेत आहे.      

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here