शरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित

मुंबई :

सध्या राज्याच्या राजकीय पटलावर राज्यपाल नियुक्त विधानपरिषद उमेदवार कोण होणार? कुणाला ही लॉटरी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले आहे. तसेच सर्व राजकीय घडामोडी याच अनुषंगाने घडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यपाल हे विधानपरिषदेसाठी सदस्य निवडताना कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान या संदर्भातच विचार करणार आहेत. राज्यपालांच्या या निर्णयामुळे राजकीय उमेदवारांची धाबे दणाणले आहेत. अशातच अभिनेता शरद पोंक्षे यांचेही नाव राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने पाठविले असल्याचे समजते. 

शरद पोंक्षे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचा विरोध होऊ शकतो. कारण पोंक्षे आणि या दोन्ही पक्षातील नेत्यांचे अनेकदा वैचारिक खटके उडाले आहेत. पोंक्षे यांच्या भूमिकेला अनेकदा राष्ट्रवादीने जाहीर विरोध दर्शविला आहे. असे सगळे असताना महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना हे नाव चालणार आहे का, हादेखील कळीचा प्रश्न आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव पाठविले असल्याची चर्चा सुरू आहे. उर्मिला मातोंडकर यांनीही शिवसेनेच्या प्रस्तावाला होणार दिला असल्याचे समजते. अभिनेत्री रेणुका शहाणे यांना काँग्रेसतर्फे विधान परिषेदेवर पाठवण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here