म्हणून आता मिरचीचा भाव वाढण्याची आहे शक्यता; वाचा, कसा बदलणार मिरची बाजाराचा कल

नंदुरबार :

गेल्या २ महिन्यात कांद्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. केंद्राने विविध पद्धतीने लगाम लावत कांद्याचे भाव कमी केले. या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. आता अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मिरचीचे पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तसेच यावर्षी मिरचीवर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला परिणामी मिरचीचे उत्पादन कमी झाले असल्याने मिरची आता भाव खाणार आहे.

नंदुरबार हा महाराष्ट्रातील प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी मिरचीच्या उत्पादनात मोठी घट जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अतिवृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातही मिरची पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. उर्वरित मिरची उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता मिरचीला बाजारपेठेत तेजी राहणार आहे.       

नंदुरबारचे मिरची उत्पादक शेतकरी माळी यांनी आपल्या तेरा एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली आहे. दरवर्षी त्यांना तीनशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न होत असते. मात्र या वर्षी उत्पन्नात तब्बल 70 टक्के घट झाली आहे. शेतीसाठी त्यांनी टाकलेलं भांडवलदेखील निघणे अशक्य असल्याचे माळी सांगतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here