रेणुका शहाणे यांना काँग्रेसतर्फे विधान परिषेदेवर पाठवा; ‘या’ कॉंग्रेस नेत्याने केली मागणी, उडाला गोंधळ

मुंबई :

राज्यपाल नामनिर्देशीत विधानपरिषद सदस्यपदी कुणाची निवड होणार? हा विषय सध्या सध्या राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची यादी मोठी आहे. या घडामोडी दरम्यान अचानक नवनवी नवे समोर येत आहेत. अशातच अभिनेत्री रेणुका शहाणे यांना काँग्रेसतर्फे विधान परिषेदेवर पाठवण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यपाल हे विधानपरिषदेसाठी सदस्य निवडताना कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान या संदर्भातच विचार करणार आहेत. राज्यपालांच्या या निर्णयामुळे राजकीय उमेदवारांची धाबे दणाणले आहेत. अशातच कॉंग्रेसच्या नेत्याने कुठलाही आग पीछा नसताना केलेली ही मागणीने अडचणीत अजूनच वाढ झाली आहे.

जेजुरकर यांनी सांगितले की, प्रत्येक चालू घडामोडींवर रेणुका शहाणे या अभ्यासपूर्ण ट्विट करतात. त्यामुळे त्यांच्या सारख्या अभ्यासू, निर्भीड आणि विद्वान व्यक्तीस काँग्रेसने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव द्यावे अशी मागणी आपण काँग्रेस पक्ष श्रेष्टींकडे केली आहे.

कंगना रणावत प्रकरणात त्यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्राची उत्तम बाजू मांडली होती. रेणुका शहाणे यांना विधान परिषद मिळाल्यास त्या अजून जोमाने काम करतील व गरजूंना न्याय देतील, असेही पुढे बोलताना जेजुरकर यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत रेणुका शहाणे :-

रेणुका शहाणे या मराठी तसेच हिंदी भाषेतल्या चित्रपटांत व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून अभिनय करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. दूरदर्शनवरील सुरभि (१९९३-२००१) या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून त्या पहिल्यांदा प्रकाश झोतात आल्या होत्या.तर “हम आपके है कौन” या हिंदी चित्रपटामुळे त्या घराघरात पोहचल्या होत्या.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here