पंकजा मुंडेंना ‘ती’ ऑफर फक्त मुख्यमंत्री ठाकरेच देऊ शकतात; संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी कमळाची साथ सोडत हाती घड्याळ बांधले. त्यानंतर पंकजा मुंडेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. याविषयी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडेंविषयी मला फार माहिती नाही. त्यांना आमच्याकडून कोणी अशी ऑफर दिली नाही. अशाप्रकारची ऑफर त्यांना फक्त उद्धव ठाकरेच देऊ शकतात, असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. 

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहेत. त्यांच्याशी आपले चांगले संबंध असल्यामुळे जर पक्षात पंकजा मुंडे यांना घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील. काही महिन्यांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्यामुळे त्यांनी पक्षापासून काहीसा दूरावा साधला होता. विधान परिषदेतह त्यांना डावलण्यात आल्यामुळेही त्यांची नाराजी दिसून आली होती. पण पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काही दिवसांपूर्वी त्यांची वर्णी लागली आहे.

दरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांना जाहीरपणे शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती.

संपादन : स्वप्नील पवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here