आता अवघ्या काही मिनिटांत जमीन मोजा; वाचा, तंत्रज्ञानाची कमाल

पुणे :

आपल्याकडे परंपरेने आणि वारशाने आलेल्या जमिनी कशाही आडव्या-तिडव्या असतात. या जमिनी कसताना आपल्या आणि शेजाऱ्यात नाहकच जुंपली जाते. जमीन मोजणे तसेही थोडे कठीण आणि झंजटीचे काम असल्याने आपण ते पुढे ढकलत असतो. मात्र आता जमीन मोजण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक सोपा पर्याय समोर आला आहे. आता आपल्याला जमीन मोजण्यासाठी ना फुटपट्टीची गरज आहे ना मोज्यांची.

आता “distance and area measurement” नावाचे एक ऍप्लिकेशन जमिनीची मोजणी करणार आहे. शेती आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी हे ऍप्लिकेशन प्रचंड फायद्याचे आहे. हे ऍप इन्स्टॉल करून जीपीएस ऑन केल्यास आपोआप जमीन मोजण्याचे काम ते करेल. 

ऍप्लिकेशन असे करेल काम :-

  • ऍप्लिकेशन उघडल्यानंतर त्यात आपल्याला अंतर हे फूट यार्ड, मीटर असे काही पर्याय आहेत ते निवडावे लागतात.
  • शेतीची जमीन मोजत असाल तर एकर हा पर्याय तुम्ही निवडू शकता.
  • त्यांनतर खाली जाऊन स्टार्ट बटण दिसते त्याला क्लिक करायचे असते. मग तुम्ही आपल्या जमिनीला एक फेरी मारायची आहे.
  • जेवढी जमीन तुम्हाला मोजायची आहे तेवढ्याच जमिनीला फेरी मारायची असते. फेरी पूर्ण झाल्यावर लगेच जमिनीचे माप आपल्याला समजते.
  • मोबाईल ऍपद्वारे शेतजमीन मोजण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला पैसे खर्च करावे लागत नाहीत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here