कांद्याच्या भावात निम्म्याने घसरण; ‘त्यावेळी’ आहे भाव वाढण्याची शक्यता

अहमदनगर :

केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना साठवणुकीचे निर्बंध घालून दिल्याने काही शेतकऱ्यांचा कांदा तसाच पडून आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील कांदा मार्केट विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम दरावर होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढत असताना दसऱ्याच्या स्र्म्यानदरम्यान भाव घसरले. आणि त्यानंतर केंद्राकडून एक नियम लागू झाला अशातच कांद्याची आयातही करण्यात आली आणि कांद्याचे भाव झटक्यात खाली घसरले.

असे असले तरी पुन्ह्जा एकदा दिवाळी पाडव्यानंतर कांदा भाव खाणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी सांगितली आहे. नगरच्या कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप ठोकळ यांनी सांगितले की, इतर देशातून कांदा आयात करण्यात आला. तसेच कांदा साठविण्यावर सरकारने बंदी घातल्याने नाशिकचे मार्केट बंद होते. त्यात मध्यप्रदेशाचाही कांदा आला होता. त्यामुळे कांद्याचे भाव पडले असून, मार्केट सुरळीत झाल्यानंतर भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचे आडमुठ्या धोरणामुळे बळीराजाचे नाहक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचा विचार न करता घेतल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत जिथे दररोज साधारणपणे 20 हजार क्विंटल कांद्याची प्रतिदिन उलाढाल होत असते. जिल्ह्यातील 13 मुख्य बाजार समितीचा विचार केला तर हाच आकडा 8 टनांपर्यंत जातो. मात्र ही सर्व उलाढाल ठप्प झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय.       

संपादन: विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here