आनंदाची बातमी : मत्स्य शेती करणाऱ्यांना सरकार देणार १५ लाखांपर्यंतचे कर्ज; वाचा, कसा मिळवायचा फायदा

पुणे :

दिवसेदिंवस शेतीला जोडधंदा करण्याची गरज वाढत चालली आहे. अशातच नव्याने शेती आणि व्यवसायाला ओळखणारे तरुण हे नवीन पारंपारिक व्यवसायाला डावलून मस्यशेतीसारखे नवे प्रयोग करत आहेत. बऱ्याचदा आर्थिक अडचणींमुळे मस्यशेती सारखा व्यवसाय करणे कठीण जात आहे. आता अशा तरुणांसाठी आणि मस्यशेती या व्यवसायाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने एक नवी योजना आणली आहे. ज्यामार्फत काळात मत्स्य शेतीसाठी १५ लाखापर्यंतची कर्ज सुविधा दिली जाणार आहे.

मत्स्य शेती व्यवसायात उत्तम पैसे मिळतात. सध्या विविध राज्यांतील खेड्यांमध्येही हा व्यवसाय नावारूपास येतो आहे. हा व्यवसाय वाढविण्यासाठी यासाठी केंद्र सरकार जवळ-जवळ एकूण किमतीच्या ७५ टक्के इतकी रक्कम पुरवणार आहे.

असे मिळवा मत्स्य शेती व्यवसायासाठी कर्ज :-

१) व्यापारी तत्त्वावर मत्स्य शेती करण्यासाठी २० लाख रुपये खर्च येतो. यापैकी ५ लाख रुपये तुम्हाला टाकायचे आहेत तर उरलेले १५ लाख रुपये सरकार देईल. सब्सिडीच्या रुपात तुम्हाला उरलेले १५ लाख दिले जातील.

२) आपण करत असलेल्या मस्य शेतीचा व्यवस्थित आणि पद्धतशीर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा.

३) सदर प्रोजेक्ट रिपोर्ट जिल्हा मत्स्य विभागाकडे सबमिट करावा लागेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here