रिलायन्स जिओ सुसाट; युजर संख्येने ओलांडला ‘हा’ महत्वाचा टप्पा; कमावले एवढे पैसे

मुंबई :

सध्या आघाडीची असणारी आणि आपला एकूण प्रवासात आपल्या विविध यशांचा वेग कायम ठेवणारी जिओ कंपनीने अजून एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. लॉकडाऊनच्या काळातही जिओने मोठी कामगिरी केली असून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जिओने ७३ लाख नवे ग्राहक जोडले आहेत. आता जिओ युजर्सची एकूण संख्या ४० कोटी ५६ लाखांवर पोहोचली आहे. 

रिलायन्सने विविध मार्गाने जवळपास निम्मा भारत आपल्या कवेत घेतला आहे. विशेष म्हणजे जिओने या तीन महिन्यात विक्रमी कमाईसुद्धा केली आहे.  शुक्रवारी रिलायन्स उद्योगाच्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली गेली. त्यानुसार जिओने प्रत्येक युजर मागे महिना १४५ रुपये कमाई केली आहे.

जिओकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जिओने केलेली कमाई ही मागील वर्षाच्यातुलनेत ३.२ टक्के अधिक आहे. गतवर्षी जिओने याच काळात ३३० कोटींचा नफा मिळविला होता. यावर्षी मात्र या नफ्यात मोठी वाढ होऊन या तिमाहीत जिओने ३०२० कोटींची एकूण कमाई केली आहे. आता जिओ कंपनीची एकूण उलाढाल २१,७०८ कोटी आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here