उत्तरप्रदेशने करून दाखवले; पहा काय किमया केलीय तिथल्या मुख्यमंत्र्यांनी

उत्तरप्रदेश म्हणजे बिमारू स्टेटमधील एक महत्वाचे राज्य. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या या प्रदेशाला विकासाचा मार्ग दाखवण्यासाठी आताचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्याला मजुरांचा पुरवठा करणारे राज्य अशीच उत्तरप्रदेशची ओळख आहे. करोनाच्या लॉकडाऊन काळामुळे येथील लाखो मजूर त्या राज्यात गेले आहेत. त्यांना तिथेच रोजगार देऊन राज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याची तयार भाजप सरकारने केली आहे. त्यासाठी त्या राज्यात तब्बल 45 हजार कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक मिळवण्यात सरकारला यश आलेले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ही महत्वाची घोषणा करून टाकली आहे. सुमारे ४० कंपन्या ही गुंतवणूक करून १.३५ लाख नवे रोजगार उपलब्ध करून देतील असे सरकारने म्हटले आहे. निवेश मित्रा नावाच्या स्कीममधून उद्योगांना मोठ्या कर आणि इतर सवलती जाहीर करून उत्तरप्रदेश सरकारने हे मोठे यश मिळवले आहे.

मात्र, अनेकदा असे करार आणि योजना जाहीर होतात, पुढे आकडेही प्रसिद्ध होतात आणि मग असे प्रकल्प उभे राहतीलच असेही काही नाही. महाराष्ट्रात हा आकड्यांचा खेळ नवा नाही. उत्तरप्रदेश राज्य हे अशा आकड्यांच्या खेळामध्ये अडकून पडते की खर्या अर्थाने तिथे असे रोजगार तयार होतात हे काही वर्षांमध्ये स्पष्ट होईल.

हीरानंदानी ग्रुप, सूर्या ग्लोबल, हिंदुस्तान यूनीलीवर, एमजी कैप्सूल्स, केश पैकेजिंग माउंटेन व्यू टेक्नोलॉजीज, सूर्या ग्लोबल फ्लेक्सी फिल्म्स प्राइवेट लिमिटेड, एमएजी सॉफ्टवेयर (अमेरिका), एकाग्राटा इंक (कॅनडा), एडिसन मोटर्स (दक्षिण कोरिया) आणि याजाकी (जापान) यांनी इथे मोठी गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here