भारतातील ‘त्या’ आठ बीचला मिळाले ब्ल्यू फ्लॅग; त्यामुळे ‘हे’ बनलेत वर्ल्ड्स बेस्ट डेस्टिनेशन

करोना कालावधी कधी एकदाचा संपतो आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम सुरू होते याचीच वाट जगभरातील फिरस्ती मंडळी पाहत आहेत. अशावेळी भारतीयांना एक खुशखबर आली आहे. भारतातील आठ वर्ल्ड्स बेस्ट डेस्टिनेशन निवडून तिथे फिरायला जाण्याची संधी आता मिळणार आहे.

ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन नावाचे सर्टिफिकेट भारतातील आठ बीचला मिळालेले आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी उत्तम असलेल्या बीचला यामध्ये स्थान मिळालेले आहे. जगभरात आता यामुळे ही आठ पर्यटनस्थळे वर्ल्ड्स बेस्ट डेस्टिनेशन म्हणून मान्यताप्राप्त झालेली आहेत.

ब्ल्यू फ्लॅग मिळालेली पर्यटनस्थळे अशी :

  1. शिवराजपूर (द्वारका, गुजरात)
  2. घोघला (दिव, दिव-दमन)
  3. कासारकोड (कन्नड, कर्नाटक)
  4. पदुबिद्री (उडुपी-मेंगलोर रोड, कर्नाटक)
  5. कप्पड (कोयीलांडी, कोझिकोड, केरळ)
  6. रुषीकोंडा (आंध्रप्रदेश)
  7. गोल्डन (पुरी, ओडीसा)
  8. राधानगर (हॅवलॉक, अंदमान-निकोबार बेटे)

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here