बिल गेट्स यांचा ‘हा’ आहे सक्सेस मंत्रा; वाढदिवसानिमित्त वाचा ‘ही’ खास माहिती

बिल गेट्स सिर्फ नाम ही काफी है. तेही जगभरात. होय, या अवलियाने आधुनिक जगाच्या उभारणीत मोठे योगदान देतानाच आपल्या श्रीमंतीने सर्वांना दिपवले आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. जगासाठी मदतीला तत्पर असलेल्या गेट्स यांनी फ़क़्त कलेक्ट न करता दानही दिले आहे.

वाढदिवसानिमित्त त्यांचा सक्सेस मंत्रा नेमका काय आहे हे समजून घेऊया. त्यांनी आपल्या भाषणात वेळोवेळी या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. आज वाचा आणि आत्मसात करून यशस्वी होण्याचा आपला वेगळा मार्ग प्रशस्थ करा.

सुरुवात : वेळेवर आणि लवकरात लवकर सुरुवात करा. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी संगणकासोबत काम करण्यास सुरुवात केली होती.

माफक बोलावे : तोंड सुटल्यासारखे फ़क़्त बडबड करीत फिरू नये. गरज असेल तेंव्हा माफक बोलावे. संवाद महत्वाचा आहे. परंतु, तो सुसंवाद असावा.

वेळ काढा : आपल्या गरजेसाठीच्या आणि आवडत्या गोष्टी करायला वेळ काढा. त्याने मन प्रफुल्लीत राहते आणि कामाची नवीन प्रेरणा मिळते.

अयशस्वी झाल्यावर शिका : अनेकदा आपण अपयशी झालो की त्या सेक्टरला सोडून नवीन क्षेत्रात नशीब अजमावला निघतो. मात्र, यशाचे जसे खुल्या दिलाने स्वागत करता, त्याचा पद्धतीने अपयशी झाल्यावर त्याचे आत्मपरीक्षण करून शिकून घेऊन पुढे जा.

सकारात्मक लोकांमध्ये राहा : आपल्या भोवताली आपल्याला आव्हान देणारी आणि सकारात्मक विचार व उर्जा देणारी व्यक्ती जोडा. त्यांच्यामुळे नाविन्याची आस कायम राहून उर्जा मिळते.

टिकेचेही स्वागत करा : यशाचे स्वागत करतानाच जर आपल्या चुका दाखवणाऱ्यांनी मुद्द्यावर बोट ठेवले तर ते ऐकून घेऊन सुधारणेला वाव द्या.

सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा : सहकारी आणि आपल्या समवेत काम करण्याऱ्या मंडळींना स्वातंत्र्य द्या. त्यांच्याकडे लक्ष ठेवतानाच त्यांच्या कौशल्यांना वाव देऊन आपली कामे विकेंद्रित करून पुढे जा.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here