त्यामुळे आपटणार कांद्याचे भाव; पहा दिवाळीपूर्वी काय घडामोडी होतील बाजारात

कांदा या राजकीयदृष्ट्या जीवनावश्यक असलेल्या पिकाच्या भावाला ब्रेक लावण्यासाठी आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोडी यांचे सरकार सरसावले आहे. त्यासाठी परदेशातून कांद्याची आयात करून देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवला जाणार आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, आतापर्यंत भारतात ७ हजार टन इतकी कांद्याची आयात झालेली आहे. तर दिवाळीपूर्वी भारतीय बाजारात आणखी २५ हजार टन इतक्या कांद्याची आवक होईल. इजिप्त, अफगाणिस्तान आणि तुर्कस्तान या देशांतून ही आयात केली जात आहे.

नाफेड या सरकारी संस्थेकडूनही कांद्याची आयात केली जाणार आहे. कांद्याची आयात केली जात असतानाच फ्युमिगेशन नियमात शिथिलता देण्यात आलेली आहे. तसेच कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंधन घालण्यात आलेले आहे.

कांदा साठवणुकीच्या नियमात बदल केल्याने व्यापाऱ्यांनी अगोदरच बाजारातील व्यवहार बंद केले आहेत. त्यातच आता केंद्र सरकारच्या निर्णयाने कांद्याची आवक वाढून सरकारच्या लेखी मग भाव नियंत्रणात येत असतानाच भाव पडणार आहेत. त्यामुळे पावसामुळे उत्पाद घटलेल्या उत्पादकांना आणखी मोठा झटका सहन करावा लागणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here