चीनमुळे ‘त्यामध्ये’ निर्माण झाला बुलीश ट्रेंड; पहा भारतीय बाजारावर काय झाला त्याचा परिणाम

बायो प्लास्टिक, बायो लुब्रीकंट, सेंद्रिय प्रक्रिया, पर्सनल केअर, पेंटिंग, कोटिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मागणी असलेला आणि जगभरात भारताचा वाटा ९० टक्के असलेले कृषी उत्पादन म्हणजे एरंडाच्या बिया. होय, भारताचा यामध्ये मोठा दबदबा आहे. त्यामध्येच चीनमुळे सध्या बुलीश ट्रेंड निर्माण झाला आहे.

बिअर आणि बुलीश अशा दोन संज्ञा शेअर आणि कमोडिटी मार्केटमध्ये असतात. त्यातील बुलीश म्हणजे वाढीचा ट्रेंड. सध्या एरंडाच्या बियांच्या भावातही चीनमुळे असाच ट्रेंड सेट झाला आहे. अनेकांनी यामुळे मागील फ़क़्त दोनच महिन्यात तब्बल ८ टक्के इतकी ग्रोथ पकडली आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तेलंगाना या राज्यांमधील शेतकऱ्यांना आणि दलालांना याचा मोठा फायदा झालेला आहे.

शेअर बाजाराप्रमाणेच कमोडिटी मार्केटमध्ये सध्या वाढीचा ट्रेंड आहे. चीनने मोठ्या प्रमाणात एरंडाच्या बिया खरेदीचा सपाटा लावल्याने मागील फ़क़्त एकाच आठवड्यात त्यामध्ये तब्बल ५.५ टक्के इतकी वाढ झालेली आहे. परिणामी ऑगस्टमध्ये ४१०० रुपयांवर असलेला या बियांचा भाव सध्या थेट ४४७० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत.

अजय केडिया यांच्यामते मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लॉकडाऊनमुळे पेरणी कमी झाल्याने अपेक्षित उत्पादन होणार नाही. त्याचवेळी चीनने याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यास सुरुवात केली असल्याने ही भाववाढ झाली आहे. सॉल्वेंट एक्सट्रैक्टर्स एसोसिएशन (SEA) यांनी याकडे भारताच्या अर्थ व वाणिज्य मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे.

एरंडाच्या बियांचे भाव असेच ट्रेंड पकडून राहिले तर ५००० रुपये क्विंटल इतकेही होऊ शकतात असे एंजल ब्रोकिंगचे अनुज गुप्ता यांनी फायनान्शियल एक्स्प्रेसला सांगितले आहे. तर, मागील वर्षी (२०१८-१९) १०.८ लाख टन इतके उत्पादन झालेल्या एरंडाच्या बियांचे यंदा उत्पादन तब्बल १९.६ लाख टन अपेक्षित असल्याने भावात घसरण होण्याची शक्यता SEA यांनी व्यक्त केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here