म्हणून रिलायंसचा नफा १५ टक्के घटला; वाचा बाजारातील महत्वाची अपडेट

जगभरात श्रीमंत गटामध्ये पहिल्या क्रमांकावर जायला निघालेल्या सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडबाबत ही महत्वाची बातमी आहे. होय, त्या कंपनीचा नफा चक्क १५ टक्क्यांनी घटला आहे.

दुसऱ्या तिमाहीचे आकडे आता प्रसिद्ध झालेले आहेत. त्यानुसार मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत मागच्या तिमाहीतील कंपनीचा नफा कमी आहे. म्हणजे एकूण कंपनीचा नफा असला तरी फ़क़्त तुलनेने तो कमी आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये वेगवान घोडदौड चालू असतानाच रिफायनिंग सेक्टरचा नफा ३६ टक्के घटल्याने एकूण घट १५ टक्के झालेली आहे.

मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ११,२६२ कोटींचा नफा झाला. तोच आताच्या मागील तिमाहीत कमी होऊन ९,५६७ कोटी झालेला आहे. याचवेळी कंपनीचा रेव्हेन्यू १.५६ वरून १.२ लाख कोटी रुपये यावर गेला आहे.

भारताच्या रिटेलिंग बिजनेसला कवेत घेण्यासाठी आसुसलेल्या या कंपनीने जगभरातून मोठ्या प्रमाणातून गुंतवणूक मिळवली आहे. जगामध्ये हा एक वेगाने फोफावणारा ब्रांड म्हणून ओळख मिळवत आहे. करोना विषाणूच्या साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळात कंपनीचा बिजनेस कमी असतानाच मोठ्या इन्व्हेस्टमेंट आल्याने ही कंपनी आता जगातील एक बलाढ्य कंपनी मानून नावारुलापा येत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here