असे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

पापड पराठे हा पदार्थ महाराष्ट्रात बनवला जात नाही. हा पदार्थ सर्वसाधारणपणे मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागात केला जातो. जेव्हा जेवण बनवण्यासाठी भाज्या मिळत नाहीत तेव्हा अशा रेसिपीज केल्या जातात. पापड पराठे पटकन होणारी आणि सोपी अशी रेसिपी आहे. चवीला हे पराठे खूप छान लागतात.

साहित्य घ्या मंडळीहो…

  1. 2 पापड
  2. 1 कप गव्हाचे पीठ
  3. चवीप्रमाणे मीठ
  4. 1 चमचा लाल तिखट
  5. 1 चमचा तूप
  6. 1 चमचा गरजेप्रमाणे तेल, पाणी

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय… लागा की बनवायला

  1. प्रथम एक कप गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ घातले आणि त्याचा गोळा बनवला
  2. 2 पापड घेऊन ते तव्या वरती भाजुन घेतले. नंतर त्याचे तुकडे केले आणि लाटण्याने थोडे लाटून घेतले. त्यात लाल तिखट आणि तूप घातले.
  3. मळलेली कणिक होती त्याचा एक गोळा घेतला आणि त्याला तेल लावले आणि त्यावर हा पापडाचे मिश्रण ठेवले आणि त्याची पोळी लाटून घेतली.
  4. गॅसवर एक पॅन ठेवला आणि त्याला तेल लावून त्यावर हा पराठा भाजण्यासाठी घातला.

आपले पापड पराठे तय्यार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here