असे बनवा मालवणी चिकन वडे; रेसिपी वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रातील मालवण म्हटलं की खवय्यांना तेथील मासे आणि कोंबडी(चिकन) वडे आठवतात. कोंबडी वडे हे तांदूळ व डाळी पासून बनवले जातात. हे कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. ‘मालवणी वडे’ म्हणूनही ते ओळखले जातात. आज आम्ही तुम्हाला मालवणी कोंबडी आणि वड्यांची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या कोकणी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 500 ग्रॅम चिकन

फोडणीसाठी

 • 2 तमालपत्र
 • 2 कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून
 • 2 टेबलस्पून आल लसूण पेस्ट
 • 1 टेबलस्पून कोथिंबीर,पुदिना पेस्ट (ऐच्छिक)
 • 2 टेबलस्पून मालवणी गरम मसाला
 • 1/2 टीस्पून हळद

वाटण करण्यासाठी

 • 1 कांदा मध्यम आकाराचा उभा पातळ चिरून
 • 7-8 लसूण पाकळ्या
 • 1 कप ओल खोबर
 • 1/4 कप सुक खोबर

वडे करण्यासाठी

 1. 750 ग्रॅम तांदूळ
 2. 200 ग्रॅम चणा डाळ
 3. 1 टीस्पून मेथीदाणे
 4. 1 टेबलस्पून बडीशेप
 5. 1 टीस्पून मिरी
 6. गरजेनुसार तेल

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय… लागा की बनवायला

-तव्यावर दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यावर लसूण व कांदा मध्यम आचेवर बदामी रंगावर परतावा. नंतर ओल खोबर परतून घ्यावं. शेवटी सुक खोबर गुलाबी रंगावर परतून घ्यावे. एक कांदा गॅसवर भाजून घ्यावा.थंड झाल्यावर थोड पाणी घालून भाजलेले कांदा खोबर व अख्खा भाजलेला कांदा मिक्सरमधून वाटून घ्यावं.
– आता त्यात स्वच्छ धुतलेले चिकन परतावे व झाकण लावून शिजू द्यावे.झाकणावर पाणी घालावे. चिकन थोडे शिजल्यावर त्यात मालवणी मसाला, हळद व मीठ घालून शिजवून घ्यावं.

– शेवटी कांद्या खोबऱ्याचे वाटण घालून मिक्स करून घ्यावे. त्यात थोड पाणी घालून एक दोन उकळ्या आणाव्यात.

– वडे करण्यासाठी दिलेले साहित्य वेगवेगळं गरम करून दळून आणावं. त्यातील तीन कप पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून कोमट पाण्याने मऊसर मळून घ्यावं. त्यात अर्धा कांदा व एक चमचा तेल घालून चार पाच तास झाकून ठेवावे.

– पिठाचे लिंबाएवढे गोळे करून केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर गोळा ठेऊन तळ हाताने वडा थापावा.

– कढईत तेल गरम करून वडे तळावेत. हे वडे काळया वाटण्याचे सांभार,तांदळाची खीर बरोबरही छान लागतात.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here