एअरटेल देणार स्मार्टफोन खरेदीसाठी लोन; वाचा, कसा होईल फायदा

दिल्ली :

आता अनेक कंपन्या स्मार्टफोन खरेदीसाठी लोन देत आहेत. फोनसाठी लोन ही आजच्या काळात काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. असे असले तरी देशातील सध्याची आघाडीची आणि मोठी असलेली दूरसंचार कंपनी एअरटेल स्मार्टफोन खरेदीसाठी लोन देणार आहे. विशेष म्हणजे लोन देताना एक भन्नाट ऑफर एअरटेल देत आहे.

मुद्देसूद जाणून घ्या या विशेष ऑफरविषयी :-

– ग्राहकांना एअरटेलच्या लँडिंग पार्टनरला ३ हजार २५९ रूपयांच्या डाऊन पेमेंटला ६०३ रूपये प्रति महिन्याप्रमाणे द्यावे लागतील.  

  • – लोनचा कालावधीही १० महिन्यांचा असेल. म्हणजेच ग्राहकाला एकून ९ हजार २८९ रूपये द्यावे लागतील. एअरटेलनं दिलेल्या माहितीनुसार याची मोबाईलसह किंमत ९ हजार ७३५ रूपये असणार आहे.
  • – यासोबत एअरटेलचा २८ दिवसांचा २४९ रूपयांचा पॅकही मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि १.५ जीबी डेटा देण्यात येतो. ३३० दिवसांच्या हिशोबानं ग्राहकांना या पॅकसाठी २ हजार ९३५ रूपये द्यावे लागणार आहे. त्यामुळे याची एकूण किंमत ९ हजार ७३५ रूपये होईल.

– एअरटेलनं स्मार्टफोसाठी लोन देण्यासाठी आयडीएफसी या बँकेसह करार केला आहे. याअंतर्गत एअरटेलची २ जी सेवा वापरणाऱ्या ग्राहतांना ४ जी अथवा ५ जी तंत्रज्ञान असलेला फोन घेण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here