म्हणून होतेय ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करण्याची मागणी; ‘त्यात’ झालाय घोळ

जेजुरी :

‘जय मल्हार’ या प्रचंड यशस्वी झालेल्या मालिकेनंतर महेश कोठारे निर्मित कोठारे प्रोडक्शनने ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका लोकांसमोर आणली. सुरवातीला महेश कोठारे यांनी ‘या मालिकेत चुकीची माहिती दाखवली जाणार नाही, पुजाऱ्याकडून योग्य ती माहिती घेतली जाईल’, असे स्पष्ट केले होते. मात्र आता या मालिकेत चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही मालिका मोठ्या वादात सापडली आहे.

जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांनी या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. मालिका बंद करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच ‘दख्खनचा राजा जोतिबाचा चुकीचा इतिहास दाखवत भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही मालिका तातडीने बंद करावी’, अशी मागणी करत पुजाऱ्यांनी मालिकेविरोधात निदर्शनंही केली आहेत.

आता आमचा भ्रमनिरास झाला आहे.  आता जी मालिका दाखवली जात आहे, त्याच अनेक चुकीच्या घटना आहेत, चुकीची माहिती प्रसारित केली जाते आहे. असा आरोप गुरव समाजातील पुजाऱ्यांनी केला आहे. या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू आहे. त्यासाठी कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभारण्यात आला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here