भाजप नेत्याचा टोला; मोदी सरकारने अदानी अंबानीला विकल्याच्या…

मुंबई :

वेतन, अन्य खर्च भागवण्यासाठी एसटी महामंडळाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानके तारण ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर ‘लाल किल्ला आणि विमानतळे मोदी सरकारने अदानी अंबानीला विकल्याच्या अफवांवर बांगड्या फोडणाऱ्या चमच्यांनी या बातमीवर मौन बाळगले आहे’, असा टोला भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी हाणला आहे.

त्यांनी ट्वीट करत म्हटले की, वेतन, अन्य खर्च भागवण्यासाठी एसटी महामंडळ सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढणार. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानके तारण ठेवण्यात येणार आहेत. लाल किल्ला आणि विमानतळे मोदी सरकारने अदानी अंबानीला विकल्याच्या अफवांवर बांगड्या फोडणाऱ्या चमच्यांनी या बातमीवर मौन बाळगले आहे.

दरम्यान आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारचा निधी किंवा बँकेचे कर्ज हाच सध्या एकमेव पर्याय महामंडळासमोर आहे. त्यामुळेच बँकेचे कर्ज काढण्याचा विचार होत असल्याची माहिती परब यांनी दिली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here