‘अशा’ प्रकारे अॅपल संपवणार गुगलची एकाधिकारशाही; वाचा, काय आहे विषय

दिल्ली :

सध्या गुगल हे एकमेवाद्वितीय सर्च इंजिन आहे. भविष्यातही गुगलला कोणी टक्कर देऊ शकेल का? अशी कल्पनाही कुणाला करता येणार नाही. कारण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अगदी कमी वेळे मोठी झेप घेत प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर जबरदस्त पकड असणाऱ्या गुगलला आता एक मोठी कंपनी टक्कर देणार आहे.

अॅपलने  आता नवीन पाऊल उचलत आपल्या फोनमधून गुगलला कल्टी दिली आहे. आयफोनच्या नवीन मॉडेलमध्ये आयओएस १४ या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बदल केले आहेत. आयओएस १४ मधील काही सर्च फंक्शनमध्ये गुगलचा समावेश नाही. आयफोनच्या होम स्क्रीनवर (टुडे व्ह्यू)उजव्या बाजूला स्वाइप केल्यानंतर उघडणाऱ्या विंडोमध्ये सर्च केल्यास गुगल रिझल्टऐवजी अॅपल जनरेटेड लिस्ट दाखवली जात आहे, अशी माहिती फायनान्शियल टाइम्सने दिली आहे.

यावर अद्याप अॅपलने कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांनी अॅपल गुगलशी टक्कर घेतल्याचे सांगितले आहे.  वेब सर्चची ही क्षमता अॅपलच्या इनहाऊस विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे, अशीही माहिती तज्ञांनी दिलेली आहे.

सध्या कोर्टात आहे अॅपल- गुगलचे भांडण :-

अमेरिकेच्या न्याय विभागाने अॅपलविरुद्ध एक गुन्हा दाखल केला आहे. अॅपलमध्ये सर्च इंजिन म्हणून आपल्याला कायम ठेवावे म्हणून गुगलने अॅपलला प्रचंड रक्कम (५८ हजार कोटी ते ८७ हजार कोटी) दिल्याचे हे प्रकरण आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here