१० म्हशींच्या डेअरीसाठी सरकार देतयं ७ लाखांचं कर्ज, अनुदानही मिळणार; असा मिळवाल योजनेचा लाभ

पुणे :

शेतकऱ्यांसाठी वाईट काळातही साथ देणारा जोडधंदा म्हणजे दुग्धव्यवसाय आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विविध जोडधंद्यांचा विकास व्हावा म्हणून अनेक योजना आणत असते. तसेच आर्थिक पाठबळ देता यावे, यासाठी प्रयत्न करत असते. आता सरकारने दूग्ध उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून एक जबरदस्त  योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वत:चा डेअरी व्यवसाय सुरू करू शकता. 

या योजनेचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सरकार तुम्हाला डेअरी व्यवसायासाठी आता कर्ज देणार आहे. इतकेच नाही तर त्यासाठी तुम्हाला देत असलेल्या कर्जाला अनुदानही सरकारकडून दिले जाणार आहे.

या योजनेविषयी मुद्देसूद माहिती :-

  • दूग्ध व्यवसाय या योजनेच्या अंतर्गत सरकार १० म्हशींची डेअरी सुरू करण्यासाठी तब्बल ७ लाखांचे कर्ज देत आहे.
  • हे कर्ज पशुधन विभागाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
  • कर्जावर खुल्या प्रवर्गावाला २५ टक्के तर महिला आणि अनुसुचित जातीच्या वर्गातील डेअरी चालकांना ३३ टक्के अनुदान मिळणार आहे.
  • ही योजना नाबार्ड मार्फत चालविली जात आहे.
  • भारत सरकारने १ सप्टेंबर २०१० मध्ये ही योजना सुरू केली होती.
  • व्यवसाय सुरू करणाऱ्याला फक्त १० टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. तर ९० टक्के रक्कम ही सरकार देणार आहे.
  • या कर्जावर मिळणारे अनुदान हे नाबार्ड मार्फत दिले जाणार आहे. ज्या बँकेतून कर्ज घेतले असेल त्यात बँकेत हे अनुदान जमा होणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा व्यवसाय करण्याऱ्या इच्छुकांनी वाणिज्यिक बँक, क्षेत्रिय बँक, राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत चौकशी करू शकता. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here