शेतामध्ये ‘ही’ घ्या महत्वाची काळजी; कारण प्रश्न आहे आपल्या आरोग्याचा

शेतजमीन कसताना म्हणजे त्यात पिक घेताना अनेक समस्या आणि अडचणी येतात. अशा अडचणींवर मात करण्यासह शेतात काम करताना आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याचीही काळजी घेत राहणे आवश्यक असते. मित्र-मैत्रिणींनो, आज आपण त्याचीच माहिती घेणार आहोत.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण शेतातील कष्ट हे काही सामाजिक भावनेने करीत नसतो. तिथे जे काही चालू असते ते पैसे कमविणे आणि जगण्याच्या धडपडीसाठीच केले जाते. त्यामुळे शेतात काम करताना आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण, असे केल्याने आपण मोठ्या कष्टाने कमावलेले पैसे दवाखात्यात आणि औषध कंपन्यांच्या गल्ल्यात जमा करण्याची वेळ येते. जास्त पैसे कमविण्याचा अट्टाहास करून अजिबात आपल्या अंगावर आजार काढू नका.

शेतात काम करून भाव मिळण्याची अगोदरच या जगात काहीही खात्री नाही. मग अशावेळी उगीचच अट्टाहास करून मग आपण कशाला आणखी एकदा आगीतून फुफाट्यात पडावे. कारण, आपण मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य यांना हमीभाव तर सोडा परंतु, नफा मिळेल असेही काहीच जर हाती आले नाही तर मग मात्र यातून मनस्तापच हाती येतो. इतके कष्ट आणि मेहनत घेऊन असा मनस्ताप कोणालाही परवडणारा नाही.

पुरुष तरी अनेकदा स्शेतात काम करताना काळजी घेतात. मुख्य म्हणजे शेतामधील महत्वाची कामे या महिलाच करतात. पुरुष फ़क़्त पेरणी आणि काढणीच्या वेळी आणि गरज पडली तर लाईट जोडायला शेतात जातात. इतर प्रत्येकवेळी महिलाच शेताचा ताबा घेऊन कष्ट करीत असतात. त्याच महिला शेतकऱ्यांना अंगावर आजार काढण्याची मोठी सवय असते.

काटकसर करण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने मग त्या शेतात आणि घरात काम करतानाही तशाच जगतात. त्याचवेळी आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मग व्याधी जीर्ण आणि जुन्या झाल्या की मग मात्र महिलांना आरोग्यावर मोठा खर्च करावाच लागतो. त्यामुळे अगोदरच अकाली घ्यायला काय हरकत आहे. शेतामध्ये महिलांनी अशी काळजी घेतानाच सगळ्यांनी साप आणि विंचूकाटा यापासून रक्षण होण्याचीही काळजी घ्यावी. आपल्याकडे वीज दिवसा आणि मुबलक मिळेल याची खात्री नसल्याने रात्री-अपरात्री शेतात काम करावे लागते. असे रात्री शेतात जाऊन काम करू नये असे म्हणणे म्हणजे शेतात काहीच पिकावू नये असे म्हणणे आहे.

त्यामुळे रात्री शेतात जाताना काळजी घ्यावी. तसेच कीटकनाशक फवारणी आणि हाताळणी करतानाही काळजी घ्यावी. कारण, विदर्भात अनेक ठिकाणी शिफारस नसलेली कीटकनाशक एकत्रित मिसळून फवारणी केल्याने अनेकांचा मृत्यू झालेला आहे. अशा पद्धतीने शेती करणे आपल्याही जीवावर बेतणार नाही याची काळजी घेऊन शेतीत कष्ट करावे.

अनेक अहवालातून स्पष्ट झालेले आहे की, शेतकऱ्यांना झालेल्या विषबाधेमागे कीटकनाशक फवारतानाचा निष्काळजीपणाच कारणीभूत होता. त्यातही अज्ञान असल्याने किंवा कृषी सेवा केंद्र चालकांनी चुकीचा सल्ला दिल्याने शेतकऱ्यांची त्यावेळी फसवणूक झाली होती. अनेकांना तर जीव गमवावा लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेण्यासह योग्य माहिती आणि अभ्यास करूनच शेती फुलविण्याचे स्वप्न पाहण्याची आवश्यकता आहे.

कीटकनाशक फवारणी करताना कृषी विभागाने शिफारस केलेल्या प्रमाणातच रसायन मिशन तयार करावे. भुकटीची फवारणी करणार असल्यास अशी भुकटी सुरुवातीला थोड्या पाण्यात मिसळून घ्यावी आणि मग गरजेनुसार त्यात पाणी टाका.

असे मिश्रण तयार करताना हातमोजे व तोंडाला मास्क लावावा. फवारणी करताना डोक्यावर कापड आणि अंगभर कपडे घालावेत. पंपाचे नोझल दूर ठेवावे. कीटकनाशक अंगावर पडणार नाही यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी अजिबात करू नका. फवारणीसाठी वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरू नका. वापरायचे असतील तर ते स्वच्छ धुवून घेऊन मगच वापरावेत.

लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here