उदयनराजेंच्या नेतृत्वात आज होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द; वाचा, काय झाला विषय

पुणे :

राज्याच्या राजकीय पटलावर सध्या मराठा आरक्षण आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडी हा चर्चेचा विषय आहे. पुण्यात आज होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आली आहे. ही परिषद भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज दुपारी दोन वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमध्ये होणार होती. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून निरोप देण्यात आला की, आज होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आली आहे.   

अचानक परिषद रद्द करण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. या परिषदेत मराठा आरक्षणासंबंधित असलेल्या अनेक विषयांवर चर्चा तसेच मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सदर परिषद आयोजित केली होती. याचिकाकर्ते, अभ्यासक, विधीतज्ज्ञांसह इतर अनेक मान्यवर मराठा आरक्षण परिषदेला उपस्थित राहणार होते.

निमंत्रित केलेल्या सर्व मान्यवरांना ही परिषद रद्द झाल्याचा निरोप सांगण्यात आला आहे. मात्र अचानक बैठक का रद्द करण्यात आली यासंदर्भात कोणतीही माहिती दिली गेली नाही. मराठा आरक्षण परिषदेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठेतरी सुटेल, ही अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. पण बैठक रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here