तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा; ‘या’ भाजप नेत्याचा झाला संताप

मुंबई :

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृस्तीचा तडाखा बसला. शेतीसह ईतरही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. महाविकास आघाडी सरकारकडून पंचनामे करण्याचे आदेश आले. पंचनामे झाले, मदत जाहीर झाली मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा’, असे म्हणत राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

राणे पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्त बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले?? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here