‘पब्जी’ भारतात कायमची बंद; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण

दिल्ली :

सुरक्षा आणि माहितीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने पब्जी या गेमवर तात्पुरती बंदी घातली होती. त्यावेळी केंद्र सरकारने डिजिटल स्ट्राईक करत तब्बल ११८ चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. यात पब्जीचाही समावेश होता. कंपनीने पब्जीच्या चाहत्यांना थोडा काळ बघण्यास सांगितल होते. काहीतरी चांगले बाहेर पडेल, असेही म्हटले होते. मात्र अखेरीस आजपासून पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाइट भारतात पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिली. या बातमीमुळे पब्जी या गेमच्या चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे पोस्टमध्ये :-

आम्ही आमच्या युझर्सच्या डेटाचे संरक्षण करण्याला नेहमीच प्रथम प्राधान्य दिले आणि भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे आम्ही नेहमीच पालन केले आहे. आमच्या गोपनीयता धोरणात जाहीर केल्यानुसार सर्व युझर्सची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. या निर्णयाबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि पब्जी मोबाइलसाठी भारतात दिलेले समर्थन आणि प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली आहे.

पब्जी गेमबाबत काही महत्वाचे मुद्दे :-

१) मोबाईलमधील एपीके जर इन्स्टॉल केले असेल तरीही आता पब्जी गेम खेळता येणार नाही.

२) पब्जी मोबाईल गेमच्या एकूण युजर्सच्या संख्येत भारताचा वाटा २५ टक्के होता.

३)भारतात पब्जीवर बंदी आणल्यावर कंपनीचा बाजार भाव जवळपास ३४ अब्ज डॉलरने घसरला.

४) या कंपनीला दररोज तब्बल ३ कोटी सक्रिय युजर्स जोडले जात होते.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here