अखेर ४ दिवसांनंतर कांद्याचे लिलाव सुरू मात्र ‘त्या’ कारणामुळे भावात घसरण

नाशिक :

गेल्या ४ दिवसांपासून ठप्प असलेले कांदा लिलाव अखेर राज्यातील नेत्यांच्या मध्यस्थीने सुरु झाले. कांद्याचे भाव कमी व्हावेत म्हणून केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर साठवणुकीवर घातलेल्या बंधनाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा लिलाव सुरु झाले असले तरी आज जास्तीस जास्त 5900 तर सरासरी 4700 रुपये भाव मिळत आहे.

तसेच अनेक शेतकऱ्यांचा कांदा पडून आहे कारण केंद्र सरकारने घातलेल्या बंधनामुळे व्यापारी क्षमतेपेक्षा जास्त कांदा घ्यायला नकार देत आहेत. केंद्र सरकारचे आडमुठ्या धोरणामुळे बळीराजाचे नाहक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचा विचार न करता घेतल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत जिथे दररोज साधारणपणे 20 हजार क्विंटल कांद्याची प्रतिदिन उलाढाल होत असते. जिल्ह्यातील 13 मुख्य बाजार समितीचा विचार केला तर हाच आकडा 8 टनांपर्यंत जातो. मात्र ही सर्व उलाढाल ठप्प झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय.       

दोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री चालू होती नंतर त्यात दुपटीने वाढ होऊन नवीन कांद्याला किलोस 30 ते 50 रुपये तर जुन्या कांद्यास 50 ते 63 रुपये भाव मिळू लागला होता. नंतर केंद्राने किमतीला लगाम लावण्यासाठी मोठे पाऊल उचलले आणि व्यापाऱ्यांना कांदा साठवणूक करण्यास मर्यादा घालून दिली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here