पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट फायदा; वाचा, कसा करावा अर्ज

सध्या आर्थिक संकटाचा काळ सुरु आहे. लोक थोडे थोडे पैसे एकत्र करून का होईना, छोटी-मोठी गुंतवणूक करत आहेत. सध्या आर्थिक क्षेत्राचा अंदाज लावणे कठीण होऊन बसले आहे त्यामुळे नेमकं कुठे गुंतवणूक करावी जेणेकरून जास्त परतावा मिळेल, अशा पद्धतीची संधी लोक शोधत आहेत. म्हणूनच आज आम्ही आपल्याला सरकारची छोटी बचत योजना असलेल्या किसान विकास पत्र(KVP)ची माहिती देत आहोत. या योजनेचे वैशिष्ट्य असे आहे की यात तुम्ही अगदी १००० रुपये सुद्धा गुंतवू शकता. आपल्या गावच्या किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही या योजनेचा लाभ तुम्ही बिनदिक्कत घेऊ शकता.

किसान विकास पत्र म्हणजे काय :-

बाँडप्रमाणेच हे एक कागदपत्र आहे, जे कुणीही खरेदी करू शकतं. अल्पवयीन मुलांसाठीही तुम्ही हे विकास पत्र खरेदी करू शकता. दोन व्यक्तींच्या नावेसुद्धा हे विकास पत्र खरेदी केलं जाऊ शकतं.

ही आहेत या योजनेची वैशिष्ट्ये :-

  • 1 हजार, पाच हजार, 10 हजार आणि 50 हजारांचं किसान विकास पत्र उपलब्ध
  •  यावर चांगलं व्याज मिळतं.
  • या योजनेवरील व्याजाचे दर सरकार वेळोवेळी बदलत असते.
  • ही योजनेअंतर्गत देशातल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडता येऊ शकते.
  • एकदा गुंतवणूक केल्यावर पैसे काढण्यासाठी कमीत कमी 2.5 वर्ष थांबावे लागते.

हे आहेत ईतरही फायदे :-

किसान विकास पत्रमध्ये तुम्हाला टॅक्समधून सूट मिळते. 

तुमच्या पॉलिसीची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर टीडीएस न कापता तुम्हाला पूर्ण रक्कम मिळणार आहे.

हे कागदपत्रे आवश्यक :-

आधार कार्ड, 2 पासपोर्ट साइज फोटो, ओळखपत्र(रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आदी), निवास प्रमाणपत्र(विजेचं बिल, टेलिफोन बिल, बँक पासबुक), तुम्ही 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला पॅन कार्ड गरजेचं असतं.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here