कोंबडी चोरीला गेली तर अशा असतील नेत्यांच्या प्रतिक्रिया; हसा चकटफू

राहुल गांधी – कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.

बाळासाहेब ठाकरे – जर कोंबडी वापस मिळाली नाही तर, त्या कोंबड्याला [चोराला] पहाटे आरवायला लावू. हे कोंबडी चोराने हे लक्षात ठेवावं.

राज ठाकरे – जर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

उद्धव ठाकरे – गेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक खुपसू नये.

आर आर पाटील – मोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये.

रामदास आठवले – ज्याने कुणी पळवली आहे कोंबडी, त्याला आम्ही घालायला लावू लंगडी, नंतर खेळू फुगडी, वाहायला लावू कावडी…

अजित पवार – त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्याने कुणी कोंबडी पळवली आहे त्याने ती गप आणून द्यावी. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.

नारायण राणे – हिम्मत असेल तर कोंबडी चोराने मालवणात येऊन दाखवावे.

मायावती – कोंबडी पळवणे हे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे.

नितीन गडकरी – कोंबडी चोर हा काय सरकारचा जावई आहे?

शरद पवार – जे काही झालं त्याची आम्हाला खंत आहे. लवकरच कोंबडीचोराचा छडा लावला जाईल.

देवेंद्र फडणवीस – नेमक्या किती कोंबड्या चोरी गेल्यात आधी त्याचा अभ्यास होईल. मगच चोराला शोधले जाईल.

राष्ट्रपती– कोंबडी चोरीला जाणे ही अतिशय वेदानादेह घटना आहे. मी ह्या घटनेचा ‘तीव्र’ शब्दात निषेध नोंदवतो.

मनमोहन सिंग – कोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.

पी. चितंबरम – यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.

दिग्विजयसिंह – कोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.

अण्णा हजारे – जर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी पुन्हा ‘आमरण उपोषणाला’ बसेन.

रामदेवबाबा – कोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?

अटलबिहारी वाजपेयी – कोंबडी पळवणे……… ही…….. चांगली गोष्ट नाही…… मी सरकारला……. अनुरोध…… करेन की……. त्यांनी लवकरात लवकर……. त्या कोंबडी चोराचा छडा……. लावावा.

लालू प्रसाद यादव – अरे मुर्गी थो चोरी हुई है न! मिल जायेगी| भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here