हे बळकट विचार देतील जगण्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन; नक्कीच वाचा

१) एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात 

२) काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. 

३) आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

४) जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

५) आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

६) जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,
तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे. 

७) दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात
आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.

८) स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

९) आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

१०) एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही,
पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here