धक्कादायक : लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांची प्रायव्हसी धोक्यात; वाचा, काय घडला प्रकार

पुणे :

एखाद्या व्यक्तीचा बँक खाते क्रमांक काय आहे? खात्यात किती पैसे जमा आहेत? अशी आणि ईतरही बरीच माहिती एखाद्या व्यक्तीच्या खात्याबद्दल कळल्यावर फसवणूक करणे एकदमच सोपे होऊ शकते. राज्य शासनाच्या तब्बल सहा लाख कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांची गोपनीयता धोक्यात आली आहे. कारण sevaarth.mahakosh.gov.in या वेबसाइटवर गेल्यावर युजरनेम व पासवर्ड टाकल्यानंतर कोणत्याही सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्याची संपूर्ण माहिती समोर येत आहे. हे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी किती पेन्शन घेतात? अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत.

या सर्व प्रकारामुळे हॅकर्सकडून फसवणूक होण्याचा धोका सहजच आहे. यात एखाद्या खात्याविषयी माहिती घेताना फक्त एकच ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल आहे. बँकविषयक माहिती घेण्यासाठी इतर कुठल्याही ठिकाणी किमान तीन ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल असतात. विशेष म्हणजे ही माहिती तर साधा हॅकरसुद्धा सहजासहजी उपलब्ध करूच शकतो. पण तो लुटही करू शकतो.

नेमकं काय माहिती उपलब्ध होते :-   

ट्रेझरी ऑफिस, बँकेचे नाव, खातेदाराचे नाव, संपूर्ण बँक खात्याचे डिटेल्स, बँक खाते क्रमांक

या प्रकरणावरून लेखा व कोषागरे विभागाचे संचालक जयगोपाल मेनन यांनी सांगितले की, पेन्शनची माहिती सहज मिळावी, अशी निवृत्तिवेतन-धारकांचीच मागणी होती. त्यामुळे सोपी पद्धत आणली, पण त्यात गोपनीयता धोक्यात येणार असेल तर विधि व न्याय विभागाचा सल्ला मागून फेरआढावा घेतला जाईल व उणिवा असल्यास त्या दूर केल्या जातील.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here