सोन्यामध्ये दागिने खरेदी सोडून गुंतवणूक करण्यासाठी आहेत आणखी 3 मार्ग; वाचा, कशी करावी गुंतवणूक

सध्या कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकट आहे. लोक सध्या सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या संधी शोधत आहेत. सध्या सोने खरेदी करण्याकडे लोकांचा वाढता कल आहे. परंतु आपल्यापैकी अनेक जण सोने खरेदी करताना सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करतात. आज आम्ही आपल्याला सोने खरेदी करण्याचे ईतरही ३ मार्गांविषयी माहिती देणार आहोत. भारतात सोने गुंतवणूक करताना लोक याकडे विश्वासदर्शी पर्याय म्हणून पाहतात. हे खरे असले तरी लोक गुंतवणूक करताना सोन्याच्या इतर पर्यायांकडे लक्ष देत नाहीत, हेच लक्षात घेऊ आम्ही आपल्या इतर पर्याय आणि त्याविषयी माहिती देणार आहोत.

१) मार्केटमध्ये बरेच गोल्ड म्युच्युअल फंड आहेत, जे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात. सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे. आपल्या गुंतवणूकित देखील त्यानुसार चढउतार होतात.

२) अनेक बँका, मोबाइल वॉलेट्स आणि दलाली कंपन्या एमएमटीसी-पीएएमपी किंवा सेफगोल्डशी करार करून त्यांच्या अँपद्वारे सोन्याची विक्री करतात. याला डिजिटल गोल्ड म्हटले जाते. या व्यतिरिक्त आपण कमोडिटी एक्सचेंज अंतर्गत स्टॉक मार्केटमध्ये सोने खरेदी व विक्री देखील करू शकता.

३) आरबीआयच्या माध्यमातून हे तुम्ही सोने खरेदी करू शकता. 2015 पासून सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. हे आरबीआय जारी करते. सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये कमीतकमी एक ग्रॅम सोनं खरेदी करता येते. गुंतवणूकदारांनी ते ऑनलाईन किंवा रोखीने खरेदी करावे आणि त्यांना समान किंमतीचा सॉवरेन गोल्ड बाँड दिला जाईल. त्याचा परिपक्वता कालावधी आठ वर्षांचा आहे. पण पाच वर्षानंतर यातून बाहेर पडायचा पर्यायही आहे. सॉवरेन गोल्ड बाँडचे दरवर्षी व्याज 2.5 टक्के मिळते. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here