गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पिताय; भोगावे लागतील ‘हे’ दुष्परिणाम

लिंबूपाणी हे उर्जा आणि शक्तिवर्धक पेय आहे. आजकाल रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू पाणी सर्रास पिले जात आहे. दिवसाला नॉर्मल पाणी पिणेही लोक टाळू लागले आहेत. २४ तास लिंबूपाणी पिणारे महाभागसुद्धा आहेत. परंतु तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहितीच असेल ती म्हणजे कुठलीही गोष्ट अति कराल तर तिची माती होईल. तुम्ही सतत पाण्याप्रमाणे लिंबू पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा. कारण लिंबू पाण्याच्या अती सेवनामुळेही तुम्हाला गंभीर शारीरिक त्रास जाणवू शकतात. 

हे होतील दुष्परिणाम :-

  • लिंबातील सायट्रिक अॅसिडमुळे दातांवरील आवरण खराब होत जाते. अती प्रमाणात लिंबू पाणी पिण्यामुळे दात खराब होतात.
  • थंडगार लिंबूपाणी पिल्यामुळे लिंबाच्या रसातील केमिकल्सचा सुर्यप्रकाशासोबत सबंध येतो आणि त्वचा काळवंडू लागते. लिंबू पाणी अती प्रमाणात पिण्यामुळे त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही अनेक उदाहरणे संशोधनात सापडली आहेत.
  • अति लिंबू पाणी पिल्यानंतर पोटदुखी, छातीत जळजळ, मळमळ, उलटी, जुलाब अशा प्रकारचा त्रास जाणवतो.
  • अती प्रमाणात लिंबू पाणी पिण्यामुळे तुम्हाला वारंवार तोंड येण्याचा त्रास जाणवतो.
  • अती प्रमाणात लिंबू पाणी पिण्याने तुमचा मायग्रेनचा त्रासअधिक वाढू शकतो.    

असे आहे प्रमाण :-

दिवसभरात एक किंवा दोन ग्लास लिंबू पाणी पिण्यास प्यावे. सकाळी उठल्यावर  एकदा कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे अथवा जेवणानंतर लिंबू पाणी पिणे यात काहीच गैर नाही. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here