गुळापासून बनवा आरोग्यदायी बर्फी; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजकाल टेस्टी आणि चमचमीत असलेला पदार्थ आरोग्यदायी असेल याची अजिबातच खात्री नसलेल्या जमान्यात आपण वावरतो आहोत. आज आम्ही तुम्हाला टेस्ट मे बेस्ट आणि चवदार आणि आरोग्यदायी असणाऱ्या एका पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. गुळापासून बनवलेली बर्फी नक्कीच बनवा, आपल्याला आवडेल. डाएट करणाऱ्या तसेच वजन कमी करणाऱ्यांनी ही बर्फी बिनदिक्कत खावी.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 250 ग्रॅम कणीक
 2. 250 ग्रॅम गुळ
 3. 250 ग्रॅम तूप
 4. 1 टीस्पून वेलची पूड
 5. 1 टीस्पून जायफळ पूड
 6. 1 टेबलस्पून ड्राय फ्रूट
 7. 100 एमएल पाणी त्यात कणीक घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे

साहित्य घेतले असेल तर करा की बनवायला सुरवात

 1. सर्वप्रथम पॅनमध्ये तूप घालावे.
 2. त्यात कणीक घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावी.
 3. एकीकडे एका पॅनमध्ये गूळ आणि पाणी घालून दोन तारी पाक तयार करावा.
 4. पाक तयार झाल्यानंतर तो कणीकेत ओतावा. तूप लावलेल्या ताटात हे दोन्ही केलेले मिश्रण मिक्स करून ओतावे.
 5. थंड झाल्यानंतर बर्फी आकार कट करावे आणि बर्फ्या पाडून घ्या.
 6. त्यावर वेलची पूड, जायफळ पूड घालावी. काजू बदाम पिस्ता टाकावे.

आपली गुळापासून बनवलेली आरोग्यदायी बर्फी खाण्यासाठी तय्यार…   

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here