शेतकरी संघटनेनं दिला गंभीर इशारा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त पॅकेज जाहीर करा अन्यथा…

अमरावती :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालं होतं. मोठ्या प्रमाणात विविध पिकांचे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ 10 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे ते पुरेसे नसून शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त पॅकेज घोषित करावे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी तुपकर अमरावती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना तुपकर म्हणाले की, सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे. ऊस आणि दुधाच्या प्रश्वावर जसं आक्रमक आंदोलन केलं जाते.त्याच धर्तीवर सोयीबन आणि कापूसप्रश्नी आंदोलन केले जाईल, या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागेल.

पुढे बोलताना तुपकर यांनी शेतकरी आत्महत्याही वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या बेपर्वा धोरणांमुळे शेतकरी भरडला जातो आहे. केंद्राने सुद्धा मोठं मन केलं पाहिजे, त्यामुळे ही जबाबदारी कोणावर ढकलून चालणार नाही. आता दिवाळी आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढतील.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here