शेतकऱ्यांसाठी खूशखबर; ऊस उत्पादकांसह साखर कारखान्यांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दिल्ली :

सध्या केंद्र सरकार शेतकरी आणि व्यापारासंबंधी अनेक मोठमोठे निर्णय घेत आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. सदर बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. सर्वात मोठा दिलासा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. इथेनॉलच्या किंमतीत 5 ते 8 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

इथेनॉल हे वेगवेगळ्या प्रकारात बनते आणि इथेनॉल हे उसापासून बनवले जाते. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय उस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना फायदेशीर ठरणार आहे. आधी इथेनॉलची किंमत 59.48 रुपये प्रति लीटर होती आता बैठकीत ठरलेल्या टक्केवारीप्रमाणे वाढ करून इथेनॉलची किंमत 62.65 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. हेवी इथेनॉलची किंमत आधी 54.27 रुपये प्रति लीटर होती. त्यातही आता वाढ करत त्याची किंमत 57.61 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे.   

या दरवाढीमुळे साखर कारख्यानांच्या हाती जास्त पैसे येणार आहेत. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्यात येणारा आहे. या इथेनॉलमुळे झिरो प्रदूषण होते. यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसह पर्यावरणासाठी फायद्याचे असणार आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here