म्हणून जगातील पहिल्या दहा श्रीमंतांना एकाच दिवसात बसला ‘एवढ्या’ अब्ज डॉलर्सचा झटका; वाचा, काय झालाय मार्केटचा विषय

दिल्ली :

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक विषयासंबंधीत अनेक गडबड गोंधळ चालू आहेत. शेअर मार्केट, सोने-चांदी, डॉलरची किंमत, इंधन आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावणे कठीण होऊन बसले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम डॉलरवर दिसून आला. परिणामी बुधवारी डॉलर एका महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला. तसेच स्टॉक मार्केटमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. या स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या गोंधळामुळे जगभरातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यांना दिवसाला 34 अब्ज डॉलर्स (सुमारे 25.16 ट्रिलियन रुपये)चा फटका बसला आहे.

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर मार्केट, सोने-चांदीचे, इंधन आणि अशा इतर गोष्टींवर त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या बदलामुळे श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेले बिल गेट्स हे तिसऱ्या स्थानावर आलेले आहेत. भारतातील सर्वांत श्रीमंत मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास एक अब्ज डॉलर्सने घटली आहे. 

बुधवारी अमेरिकेचा शेअर बाजार 3.5 टक्क्यांपेक्षा कमी पडला आणि तो लाल निशाण्यावर बंद झाला. डाऊ जोन्सचा 943 अंकांचा पराभव झाला व तो 26519 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅसडॅकने 426 अंकांची घसरण नोंदविली. एसएंडपीमध्येही 119 गुण कमी झाले. फेसबुकचे शेअर्स साडेपाच टक्क्यांहून अधिक खाली आले.       

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here