सोन्या-चांदीच्या दरात आजही झाली मोठी घसरण; वाचा, काय आहेत आजचे दर

दिल्ली :

दिवसेंदिवस सोन्या-चांदीच्या दरात घसरण होतच आहे. दसऱ्याच्या निमित्ताने वाढलेले भाव पुन्हा कमी होताना दिसत आहेत. अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेअर मार्केट, सोने-चांदीचे दरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या आर्थिक गोष्टींचा प्रभाव देशांतर्गत आर्थिक गोष्टींवर दिसत असतो. दिल्ली सराफा बाजारात दहा ग्रॅम सोने १२१ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. याचवेळी चांदीच्या किंमती प्रति किलो १२७७ रुपयांनी घसरले आहे, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम डॉलरवर दिसून आला. परिणामी बुधवारी डॉलर एका महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला. या कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण सुरू आहे. जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अद्यापही अनिश्तितता आहे. परिणामी सोन्याच्या किंमती सातत्याने उतरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत १८७८ डॉलर प्रति औंस झाली आहे. सोन्याचे दर २ टक्क्यांनी घसरले.

सध्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here