आणखी ‘ईतक्या’ वर्षात पृथ्वीच्या पोटातील सोने संपणार; काय आहे भविष्य, वाचा थोडक्यात

दिल्ली :

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत.  अशातच आता सण-उत्सव चालू झाले असल्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होईल, यात काहीच शंका नाही. अशातच एका धक्कादायक बाब समोर आली आहे. सोने संबंधित जागतिक कंपनी गोल्डमन सॅचने एक अहवाल समोर आणला आहे. आणखी १५ वर्षात म्हणजे २०३५ सालापर्यंत पृथ्वीच्या पोटातील म्हणजे सोने खाणी मधील सर्व सोने बाहेर काढून संपलेले असेल आणि त्यामुळे जमिनीखाली सोने राहणार नाही, अशी माहिती या धक्कादायक माहिती या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर या अहवालाची चर्चा जोरात आहे. कारण गेले काही महिने सोन्याचे वाढत चाललेले दर हा जगभर चर्चेचा विषय बनला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनेही काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. जायत म्हटले होते की, पृथ्वीच्या पोटात आता अंदाजे ५४ हजार टन सोने शिल्लक असावे. पृथ्वीच्या पोटात जेवढे सोने होते त्याचा हा ३० टक्के भाग आहे. म्हणजे ७० टक्के सोने बाहेर काढले गेले आहे.

या अहवालात अजून एक धक्कादायक माहिती सांगण्यात आली आहे ती म्हणजे या खाणीतून काढल्या गेलेल्या ७० टक्के सोन्यापैकी ५० टक्के सोने दागिने घडविण्यासाठी वापरले गेले असून ते खासगी मालकीचे बनले आहे. नेमकं कोणत्या देशाकडे किती सोने आहे, हे सांगणे अवघड आहे. कारण अनेक देश असे आहेत की जे आपल्याकडे किती सोनेसाठा आहे याविषयी माहिती प्रसिद्ध करत नाहीत. जे देश माहिती देतात, तीही किती खरी असते, याबाबतचे मोजमाप करायलासुद्धा कुठलाच सोर्स उपलब्ध नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here