रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आता सहजपणे बदलता येणार फाटलेल्या नोटा; एकच आहे मजेशीर ‘अट’

दिल्ली :

सर्वसाधरणपणे दर २ दुकानदारांच्यामागे एका दुकानदाराला फाटक्या नोटांची समस्या असते. कारण ग्राहकाने दिलेल्या फाटक्या नोटा झक मारून स्वीकाराव्या लागतात आणि दुकानदाराकडून या फाटक्या नोटा कुणीच घेत नाही. परंतु दुकानदारांनो आता तुम्ही फाटक्या नोटा बिनधास्त घ्या कारण आता रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुम्हाला त्या नोटा सहज बदलून मिळणार आहेत. मात्र याला एक छोटीशी आणि मजेशीर अट घातली गेली आहे. ती म्हणजे या नोटा खोट्या नसाव्यात.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शकतत्वांनुसार, जुन्या, फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून प्रत्येक बँकेला स्वीकाराव्या लागतील. बँकेच्या शाखेमध्ये जाऊन फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी कोणताही शुल्क आकारले जाणार नाही. त्याचबरोबर नोटा बदलण्यासाठी त्या बँकेचे तो ग्राहक असणेही आवश्यक नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकच्या नियमांनुसार, अतिशय खराबप्रकारे जळलेल्या, तुकडे-तुकडे झालेल्या स्थितीतील नोटा बदलल्या जात नाहीत. अशाप्रकारच्या नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर ज्या नोटांवर कोणताही संदेश लिहिलेला असेल किंवा राजकीय संदेश असल्यास, त्या नोटांचा वापर केला जाऊ शकत नाही. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here