गृहमंत्री अनिल देशमुख ती निवडणूक जिंकण्यामागे “गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा” हे गाणे होते कारण; वाचा किस्सा

१९९५ निवडणुका होत्या. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. अनिल देशमुखांना नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण पदरी निराशा पडल्याने अनिल देशमुख आक्रमक झाले. त्यांनी थेट बंडखोरी केली आणि ही निवडणूक काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात लढायचे ठरवले. दरम्यान १९९४ मध्ये अक्षय कुमारच्या सुहाग चित्रपटातले “गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा” हे गाणं खूपच गाजलं होतं.

त्यावेळी भारतात असा माणूस शोधून सापडणार नाही ज्याला हे गाणं माहिती नाही. निवडणुकांची चिन्हे आली. अनिल देशमुख यांना “चष्मा” हे निवडणूक चिन्ह मिळाले. प्रचारकाळात लोकांच्या तोंडी फक्त चष्मा हे चिन्ह कसे ठेवता येईल याचा विचार कार्यकर्ते करत बसले नाहीत. त्यांनी एकच धडाका लावला… जिथं जाईन तिथं हे गाणं वाजवायचं…अनिल देशमुखांच्या संपूर्ण प्रचारकाळात या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्याच्या त्याच्या तोंडात चष्मा हे चिन्ह पोचले.  

आज आणील देशमुख ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. शरद पवार कॉंग्रेस उमेदवाराच्या बाजूने सभा घ्यायला आले. गाण्यामुळे लोक एवढे वेडे झाले होते की त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे शरद पवारांच्या सभेत गोंधळ घातला. परिणामी सभा रद्द करावी लागली. पुढे ती निवडणूक अनिल देशमुख जिंकले आणि युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीही बनले. आजही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here