तेव्हा मोदींनी दिला होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटण्यास नकार; वाचा हा भन्नाट किस्सा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकदम भन्नाट आणि कणखर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मनाला येईल तसे ते वागत असतात. शेवटी पंतप्रधान पद काय उगाच मिळवलं का भाऊ? त्यांनी जर एखादी गोष्ट एकदा करायची ठरवली की बस विषय संपला… मग त्यात दस्तुरखुद्द अमित शहासाहेब सुद्धा बदल करत नाहीत.

मोदीजींना आपल्यावर केलेली टीका कधीच खपत नाही, असे म्हणतात. पण एका मोठ्या आणि जगभर गाजलेल्या किस्स्यातून ते दिसून पण आले होते. मोदींना एक श्रीमंत माणूस भेटायला येणार होता. आता सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर ज्यांच्या तोंडासमोर अंबानीचा चेहरा आला असेल त्यांनी समजून घ्या सरड्याची धाव कुंपणापर्यंत… मंडळीहो… सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे अमेझॉन कंपनीचा मालक…जेफ बोजेस.

तो एकदा ३ दिवसांसाठी भारतात आला होता. त्यावेळी तो अनेक महत्वाची कामे करण्यासाठी भारत दौरा करत होता. या तीन दिवसात तो राजघाटावर गेला. ईतरही ठिकाणी गेला. बॉलीवूडमधल्या हिरो लोकांना म्हणजेच ‘अभिनयाच्या नावाने भंपकपणा करणाऱ्या’ लोकांना भेटला. पण ‘खऱ्या हिरोची म्हणजेच पंतप्रधान मोदींची’ आणि त्याची भेट झालीच नाही. कारण एक महिन्याआधीच जेफची अपॉइंटमेंट रद्द करण्यात आली.

आता ही अपॉइंटमेंट का रद्द करण्यात आली हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच त्याच उत्तर असा आहे की हा जेफ एका अशा वृत्तपत्राचा मालक होता ज्यातून सातत्याने मोदींवर मोदींच्या धोरणांवर टीका करण्यात येत होती. आणि आपल्याला माहितीये मोदींना टीका आवडत नाही. या एका कारणामुळे मोदींनी त्याला म्हणजेच सर्वात श्रीमंत व्यक्तीला  भेट नाकारली होती.

कधी कधी केली होती टीका?

  • – जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर वर्तमानपत्राने आक्रमकपणे या निर्णयाच्या विरोधात अनेक लेख छापले.
  • – बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने मोदींना दिलेल्या “ग्लोबल गोलकीपर” पुरस्कारानंतर वर्तमानपत्राने दिलेली प्रतिक्रिया सरकारला नाराज करणारी होती.
  • – CAA, NRC कायद्यांबाबत वर्तमानपत्राने अनेक टीका करणारे लेख छापले होते. १३ डिसेंबर २०१९ रोजीच्या आर्टिकलची हेडलाईन “भारताचा नवीन कायदा कोट्यवधी मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व न देता सोडून देईल” अशी होती.
  • – सरकारने याबद्दल CAA कायदा चुकीच्या पद्धतीने मांडण्यामागे चांगला उद्देश नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here