पोल्ट्री व्यवसायासाठी ‘या’ बँका सहज देताहेत कर्ज; असा मिळवा लाभ

पुणे :

आधुनिक पद्धतीने शेती आणि जोडधंदा करणाऱ्या शेतकरी बांधवांना अनेकदा आर्थिक अडचणीमुळे मोठे पाऊल उचलता येत नाही. परंतु आता कुक्कुटपालन सारखा व्यवसाय करायचा असल्यास बँका तुम्हाला सहजासहजी कर्ज द्यायला तयार आहेत. शेती-व्यवसाय  या क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय आणि खासगी बँकांसह सरकार या क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना कर्ज पुरवत आहे.

जर तुम्हालाही कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुम्ही या बँकांकडून बिनदिक्कत कर्ज घेऊ शकता.

या बँका देतात कर्ज :-

१)     स्टेट बँक ऑफ इंडिया 

२)     पंजाब नॅशनल बँक कर्ज

३)     एचडीएफसी बँक

४)     आईडीबीआई

 सदरच्या सर्व बँकामध्ये कागदपत्रे ही काही वेगळी तर काही बँकाकडून कर्ज परतफेडीचा कालावधी हा कमी जास्त आहे. तसेच प्रत्येक बँकेच्या कर्ज पात्रतेच्या वेगवेगळ्या अटी शर्ती आहेत.

सर्वसाधारणपणे सर्वच बँका पिलं, पोल्ट्री शेड, फीड रूम आणि इतर उपकरणे उभारण्यासाठी आर्थिक सेवा देतात. काही बँका २ वर्षांचा तर काही ५ वर्षांचा परतफेड कालावधी देतात. कर्जाची रक्कम – कर्जाची रक्कम पोल्ट्री युनिटच्या प्रकार आणि आकारावर अवलंबून असते. तुम्हाला ज्या बँकेचे कर्ज हवे आहे, त्या बँकेच्या जवळील शाखेस भेट द्या.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here