सगळे तयार आहेत मग राज्य सरकार नेमकं अडलंय कुठं; राज ठाकरेंचा खडा सवाल

मुंबई :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत वाढील वीज बिल आणि दूध दरवाढ या दोन मुद्द्यावर प्रामुख्याने राज ठाकरेंनी राज्यपालांशी चर्चा केली. यावेळी ‘मी इथे प्रश्नोत्तरासाठी आलेलो नाही. लोकांना येत असलेल्या वीजबिलासंदर्भात मी चर्चा केली. वाढीव वीजबिलाच्या विषयावरून गेले काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माझे सैनिक आंदोलनं करीत आहेत. सर्व जण येऊन भेटून गेलेत. वीजबिलं जी आहेत ती आम्ही कमी करू शकतो, असं सरकार सांगतंय. त्यासाठी आमच्या पक्षाचं शिष्टमंडळ जाऊन MERCला भेटून आले. पण MERC सांगतंय आमचं काहीही दडपण नाही, कंपन्या बिलं कमी करू शकतात. नितीन राऊतांना सांगितलं तर हे बघतो बोलले. सगळेच तयार आहेत मग राज्य सरकार अडलंय कुठं?’, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली, ट्रेन कधी सुरु होणार, रेस्टॉरंट उघडली आहेत, मंदिरं सुरु नाहीत, धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगावं, लोकांना जिथे २ हजार बिल येत होतं तिथे १० हजार बिले येतंय, लोकांना वीजबिलाचा मोठा फटका बसतोय, राज्य सरकारला या विषयाशी कल्पना आहे. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघावा, याबाबत लवकरच शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहे असं त्यांनी सांगितले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here