आता ‘या’ बँकेत पैसे जमा करण्यासाठीही द्यावे लागणार शुल्क; ‘या’ बँकाही लागू करणार हा नियम

मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून बँकांची आर्थिक धोरणे सातत्याने बदलत आहेत. भविष्यात येणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक बँकांनी विविध गोष्टींसाठी शुल्क लावण्यास सुरुवात केली आहे. आता सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पेट्रोल, इंधन आणि वाढत्या महागाईत आता अजून एक झटका सामान्य जनतेला बसणार आहे. आता ग्राहकांना पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी देखील काही निश्चित शुल्क द्यावे लागणार आहे. सध्या फक्त  बँक ऑफ बडोदाने हा नियम लागू केला असला तरी येत्या काही दिवसात  बँक ऑफ इंडिया, पीएनबी, अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँक या बँकही हा नियम लागू करण्याबाबत विचार करत आहेत.    

बँकेकडून आधीपासून एसएमएस सुविधा, मिनिमम बॅलन्स, एटीएम आणि चेकबुकचा वापर इ. सुविधांवर बँकेकडून शुल्क आकारले जाते. मात्र आता ईतर अनेक गोष्टींनाही शुल्क लागू केले जाणार आहे. निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा हे व्यवहार केल्यावर ग्राहकांना अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. हा नियम 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू केला जाणार आहे.

या खात्यासाठी असेल शुल्क :-

-सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खातेधार प्रति दिन एक लाख रुपये जमा करू शकतील. ही सुविधा नि:शुल्क असेल. मात्र याहून अधिक पैसे भरण्यासाठी शुल्क द्यावे लागेल

-अशा ग्राहकांना एक लाखापेक्षा अधिक रक्कम भरण्यासाठी प्रत्येक एक हजार रुपयांवर एक रुपया चार्ज द्यावा लागेल. याकरता कमीत कमी शुल्क 50 रुपये आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपये आहे.

-जर सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून एका महिन्यात तीन वेळा पैसे काढले तर कोणतेही शुल्क नाही आहे.

-या खात्यातून चौथ्यांदा पैसे काढण्यासाठी 150 रुपये द्यावे लागतील

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here