देशात पहिल्यांदाच गाढवाच्या दुधाची डेअरी; प्रती लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क

दिल्ली :

आजवर आपण गायी, म्हैस, शेळी आणि फार फार तर अजून एकाद्या दुसऱ्या प्राण्याच्या दुधाची डेअरी असते किंवा ते खाण्यासाठी वापरतात, हे ऐकले असेल. पण गाढवाच्या दुधाची डेअरीविषयी कधीच ऐकलं नसेल. आता देशात पहिली गाढवाच्या दुधाची डेअरी सुरु होत आहे. यातील विशेष गोष्ट ऐकून तुम्ही चकित व्हाल कारण या दुधाची किंमत प्रती लिटर पाच ते सात हजार रुपये एवढी आहे. 

राष्ट्रीय अनुसंधान केंद्र हरियाणा हे देशातील पहिली गाढवाच्या दुधाची डेअरी उभा करत आहेत. हरियानामधील हिसार येथे ही डेअरी उभी करून गाढवाच्या दुधाचा साठा केला जाणार आहे. हिलानी नावाच्या गाढवाच्या जातीचा या डेअरी साठी उपयोग केला जाणारा असून या डेअरीच्या दुधासाठी १० गाढवाचा समावेश असणार आहे. हे गाढवे गुजरातमधून मागवली गेली आहेत.

असे आहेत या दुधाचे फायदे :-

  • या दुधापासून अनेक महागडे प्रॉडक्ट्स तयार केले जात आहेत. त्याचा वापर हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी , कॅन्सर , ऍलर्जी या आजरांपासून बचाव होतो.
  • गाढवाचे दूध हे औषधाचा खजाना मानला जातो.
  • उर्जा आणि शक्तीसाठी या दुधाचा वापर केला जातो.

गाढवांची डेअरीचे प्रोजेक्टचे काम सुरु झालेले आहे. या प्रोजेक्टसाठी तज्ञ मंडळींची टीम नियुक्त झालेली आहे. या टीममधील डॉक्टर अनुराधा भारद्वाज यांनी सांगितलं की, लहान मुलांना अनेक वेळा साध्या दुधामुळे ऍलर्जी होते. पण गाढवाच्या दुधामळे मुलांना कोणताही त्रास होत नाही किंवा कोणताही साईट इफेक्ट होत नाही. या दुधामध्ये अँटी ऑक्सिडंट , तसेच अँटी इंजीन हे तत्व असतात. यामुळे गंभीर आजाराविरोधात लढण्याची क्षमता या दुधातून मिळते. गाढवाच्या दुधापासून अनेक पार्लर चे प्रॉडक्ट तयार केले जात आहेत. लीप बाम, साबण , बॉडी लोशन तयार केले जाते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here