म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, पृथ्वी गोल आहे; हसा चकटफू

बॅचलर पोरांना वाटतं की सगळ्या चांगल्या पोरींची लग्न होऊन गेलेत…
लग्न झालेल्या माणसांना वाटतं की आपण उगाचच लवकर लग्न केलं,
ओरिजनल स्टॉक तर मागेच राहीलाय..
पोरींना वाटतं की आपण लवकर जन्माला आलो,
हँडसम पोरं तर अजुन लहान आहेत..
बायांना वाटतं की आपल्या वेळेस अशी पोरं नव्हती.. बिच्चारे सिंगल फिरतायेत…
लहान पोरांना वाटतं की मोठ्या पोरी समजुतदार आहेत..
मोठ्या पोरींना वाटतं की आपल्या बरोबरची पोरं भरोसा ठेवायच्या लायकीचे नाहीत….
म्हणजे कसं माहीतीये का?
सगळेच चांगले आहेत..
पण कोणीच कोणाला समजुन घेत नाहीये..
म्हणजे मी सगळ्यांना समजुन घेतोय पन मला कोणीच समजुन घेत नाहीये,
सगळ्यांना असंच वाटतंय
मला कळतंय..तुम्हाला कळतंय का.??
म्हणजे एफ झेड वाला स्प्लेंडर वाल्याकडे पाहुन विचार करतो की याची गाडी भारीये.
कमी पेट्रोल लागतं… स्प्लेंडर वाला विचार करतो की याच्याकडे किती भारी गाडीये, माझ्याकडे असती तर जोरात पळवली असती
म्हणून लक्षात घ्या मित्रांनो…
पृथ्वी गोल आहे..
अन् आपला विषय खोल आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here